आयसीसी वर्ल्ड कप 2024चे वेळापत्रक जाहीर, भारत ‘या’ संघाविरुद्ध खेळणार पहिला सामना

WhatsApp Group

ICC Under-19 World Cup 2024: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अंडर-19 विश्वचषक 2024 चे नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. अंडर-19 विश्वचषक दक्षिण आफ्रिकेत खेळवला जाणार आहे. यापूर्वी या विश्वचषकाचे यजमानपद श्रीलंकेला मिळाले होते, मात्र आयसीसीने श्रीलंका क्रिकेट बोर्ड बरखास्त केले होते. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला पुन्हा 19 वर्षांखालील विश्वचषकाचे यजमानपद मिळाले आहे. यावेळी 19 वर्षाखालील विश्वचषक 2024 मध्ये एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत.

19 जानेवारी ते 11 फेब्रुवारी दरम्यान दक्षिण आफ्रिकेतील 5 ठिकाणी अंडर-19 विश्वचषक सामने खेळवले जातील. सर्व 16 संघांची प्रत्येकी चार गटात विभागणी करण्यात आली आहे. टीम इंडियाला अ गटात ठेवण्यात आले आहे. या गटात भारताव्यतिरिक्त बांगलादेश, आयर्लंड आणि अमेरिका यांचा समावेश आहे. भारतीय संघाचे तीनही गट सामने ब्लूमफॉन्टेन येथे होणार आहेत. टीम इंडिया आपला पहिला सामना बांगलादेशविरुद्ध 20 जानेवारीला, दुसरा सामना 25 जानेवारीला आयर्लंडविरुद्ध आणि तिसरा गट सामना 28 जानेवारीला यूएसएविरुद्ध खेळणार आहे.

अंडर-19 विश्वचषक 2024 मधील भारतीय संघाचे वेळापत्रक

  • भारत विरुद्ध बांगलादेश – 20 जानेवारी
  • भारत विरुद्ध आयर्लंड – 25 जानेवारी
  • भारत विरुद्ध अमेरिका – 28जानेवारी

IND vs ENG: भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर, ‘हा’ खेळाडू असणार कर्णधार

सर्व संघ सराव सामनेही खेळतील

ICC हेड ऑफ इव्हेंट्स ख्रिस टेटली म्हणाले की, गेल्या 12 महिन्यांत आम्ही दक्षिण आफ्रिकेने दोन यशस्वी क्रीडा स्पर्धांचे यजमानपद पाहिले आहे. ICC अंडर-19 महिला टी-20 विश्वचषक आणि त्यानंतर लगेच ICC महिला टी-20 विश्वचषक. अंडर-19 विश्वचषक 2024 चे आयोजन केल्याने आम्हाला ही गती वाढवण्याची आणि पाच आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये जगभरातील सर्वोत्तम युवा क्रिकेटपटूंचे स्वागत करण्याची संधी मिळते. सर्व संघ 13 ते 17 जानेवारी दरम्यान दोन सराव सामने खेळणार आहेत.

अंडर-19 वर्ल्डकपमध्ये 4 गट तयार करण्यात आले आहेत

  • अ गट : भारत, बांगलादेश, आयर्लंड, अमेरिका
  • ब गट: इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, स्कॉटलंड
  • क गट: ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिम्बाब्वे, नामिबिया
  • ड गट : अफगाणिस्तान, पाकिस्तान,