आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट ICC Women’s World Cup 2022 स्पर्धेला आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना हा कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणाऱ्या पाकिस्तान संघासोबत होणार आहे India vs Pakistan Women’s World Cup match. हा सामना 6 मार्चला खेळण्या येईल. यजमान न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात विश्वचषक स्पर्धेचा पहिला सामना ४ मार्चला खेळण्यात येईल.
आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत सहभागी झालेले सर्व आठ संघ एकमेंकासोबत प्रत्येकी एक सामना खेळतीस. यातील पहिले ४ संघ सेमी फायनलमध्ये जातील आणि त्यातून दोन संघ विजेतेपदासाठी अंतिम सामना खेळतील. अंतिम सामना हा ख्राईस्टचर्चच्या मैदानावर खेळला जाणार आहे. भारताचे सर्व सामने हे सकाळी ६.३० ला सुरू होतील.
विश्वचषक स्पर्धेत असे असतील भारतीय महिला संघाच सामने
- भारत विरुद्ध पाकिस्तान – 6 मार्च
- भारत विरुद्ध न्यूझीलंड – 10 मार्च
- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज – 12 मार्च
- भारत विरुद्ध इंग्लंड – 16 मार्च
- भारत वि ऑस्ट्रेलिया – 19 मार्च
- भारत विरुद्ध बांगलादेश – 22 मार्च
- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – 27 मार्च
महिला विश्वचषकासाठी असा आहे भारतीय संघ – मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यस्तिका भाटिया, रिचा घोष, तानिया भाटिया, स्नेह राणा, झुलन गोस्वामी, पूजा वस्त्राकर, मेघना सिंह, रेणुका सिंह ठाकूर, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव.