Womens World Cup: १०७ धावांनी विजय मिळवत भारतीय महिला संघाने उडवला पाकिस्तानचा धुव्वा!

WhatsApp Group

आयसीसी महिला विश्वचषकात ICC Womens World Cup 2022 भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या आजच्या सामन्यात भारतीय महिला संघाने दमदार विजय मिळवला आहे.  या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांत ७ गडी गमावून २४४ धावा केल्या. भारताने दिलेल्या २४५ धावांच्या  आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ ४३ षटकांत सर्वबाद १३७ धावा करू शकल्याने भारताने १०७ धावांनी हा सामना आपल्या नावावर केला India Women win by 107 runs.


या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघासाठी तीन फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. पूजा वस्त्राकर (६७ धावा), स्मृती मानधना (५२ धावा) आणि स्नेह राणा (५३* धावा) यांनी चमकदार कामगिरी केली. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या भारताची सुरुवात खराब झाली. डावाच्या तिसऱ्या षटकात शफाली वर्माला शून्यावर बाद झाली. मात्र, त्यानंतर दीप्ती आणि मानधना या जोडीने भारतीय डावाला गती दिली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी केली. पाकिस्तानकडून निशारा सिंधू आणि निदा दार यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. दुसरीकडे डायना बेग, अनिम अमीन आणि फातिमा सना यांनी प्रत्येकी एक विकेट घेण्यात यश मिळवला.