एकदिवसीय विश्वचषकादरम्यान आयसीसीने मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने भारताच्या शेजारी देशाचे सदस्यत्व रद्द केले आहे. यामुळे आता हा संघ एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळू शकणार नाही. आयसीसीने बंदी घातलेला हा देश दुसरा कोणी नसून श्रीलंका आहे. आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे शुक्रवारी श्रीलंका क्रिकेटचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. श्रीलंका सरकार क्रिकेट बोर्डात हस्तक्षेप करत असल्याचे आयसीसीच्या बैठकीत दिसून आले. जे आयसीसीच्या नियमांच्या विरोधात आहे. अशा परिस्थितीत आयसीसीला हे मोठे पाऊल उचलावे लागले.
सध्याच्या एकदिवसीय विश्वचषकात श्रीलंकेच्या खराब कामगिरीमुळे देशाच्या क्रिकेट बोर्डात अनेक बदल करण्यात आले आहेत. आयसीसीने आजच्या बैठकीत श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाने आपल्या जबाबदाऱ्यांचं उल्लंघन केलं असल्याचा ठपका ठेवला. बोर्डाच्या व्यवहारांचं स्वायत्तपणे व्यवस्थापन होणे अपेक्षित आहे, मात्र या प्रशासनात सरकारी हस्तक्षेप तर होतोय का? असा सवाल करत याबाबत खात्री करणं आवश्यक आहे असं आयसीसीने म्हटलं. श्रीलंकेच्या बोर्डाच्या कारवाईवर आससीसी योग्य वेळी निर्णय घेईल, असंही आयसीसीनं म्हटलं.
Sri Lanka Cricket suspended by ICC Board.
More here ⬇️https://t.co/3QcLinUPp0
— ICC (@ICC) November 10, 2023
आयसीसी पुढील बैठकीत निर्णय घेईल
वृत्तानुसार, आयसीसीने श्रीलंका क्रिकेटला आधीच आपल्या निर्णयाची माहिती दिली आहे आणि 21 नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत पुढील पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेला निलंबनादरम्यान कोणत्याही आयसीसी स्पर्धेत भाग घेता येणार नाही आणि द्विपक्षीय मालिका खेळता येणार नाही. ते जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये ICC अंडर-19 पुरुष क्रिकेट विश्वचषक 2024 चे आयोजन करणार आहेत, त्यामुळे ICC बोर्ड त्याच्या पुढील बैठकीत निलंबनाच्या अटींवर विचार करेल.