टीम इंडियाला मोठा झटका; ICCने रवींद्र जडेजावर केली ही कडक कारवाई

WhatsApp Group

IND vs AUS: टीम इंडियाचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला नागपूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीदरम्यान ICC आचारसंहितेच्या लेव्हल 1 चे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्या मॅच फीच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. रवींद्र जडेजा Ravindra Jadeja याने ICC आचारसंहितेच्या कलम 2.20 चे उल्लंघन केल्याचे आढळून आले, जे खेळाच्या भावनेच्या विरुद्ध वर्तन दाखवण्याशी संबंधित आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी अष्टपैलू रवींद्र जडेजाने चेंडूने अप्रतिम खेळ दाखवला. 9 फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील 46 व्या षटकात हे घडले, जेव्हा जडेजा त्याच्या बोटावर क्रीम लावताना दिसला. व्हिडिओ फुटेजमध्ये, डावखुरा फिरकीपटू मोहम्मद सिराजच्या हातातून क्रीम घेतो आणि डाव्या हाताच्या तर्जनीवर घासताना दिसत आहे. मैदानावरील पंचांची परवानगी न घेता हे केले गेले, त्यामुळे रवींद्र जडेजावर ही कारवाई करण्यात आली आहे.

या घटनेनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अधिकाऱ्याने या प्रकरणाची माहिती दिली. बोर्डाच्या सूत्रांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले होते की, ‘बोटातील वेदना कमी करण्यासाठी हे मलम’ आहे. जडेजाने गुन्हा कबूल केला आणि एमिरेट्स आयसीसी एलिट पॅनेल ऑफ मॅच रेफरीच्या अँडी पायक्रॉफ्टने प्रस्तावित केलेला दंड स्वीकारला आहे.

या सामन्याच्या पहिल्या डावात रवींद्र जडेजाने 22 षटके टाकत 5 बळी घेतले. त्याचवेळी रवींद्र जडेजाने पहिल्या डावात 185 चेंडूत 70 धावा केल्या. या खेळीत रवींद्र जडेजाच्या बॅटमधून 9 चौकार दिसले. दुसऱ्या डावात रवींद्र जडेजाने 12 षटके टाकत 2 बळी घेतले.