ICC T20 Ranking: टी-20 क्रमवारीत किंग कोहलीने घेतली मोठी झेप; कोण, कोणत्या क्रमांकावर आहे, घ्या जाणून

WhatsApp Group

ICC T20 Ranking: टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वनिंदू हसरंगा यांना आशिया चषक 2022 मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कृत करण्यात आले आहे. याचा फायदा दोघांना टी-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत झाला आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या क्रमवारीत विराटने 14 स्थानांनी झेप घेतली असून तो 15व्या स्थानावर पोहोचला आहे. दुसरीकडे, प्लेअर ऑफ द टूर्नामेंट वनिंदू हसरंगाने टी-20 गोलंदाजांच्या क्रमवारीत तीन स्थानांनी झेप घेत सहाव्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

टी-20 फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा सूर्यकुमार यादव चौथ्या स्थानावर आहे, तर कर्णधार रोहित शर्मा 14व्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान टी-20 क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे, तर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्कराम दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. गोलंदाजी क्रमवारीबद्दल बोलायचे झाले तर भुवनेश्वर कुमारला एक स्थान गमवावे लागले असून तो सातव्या स्थानावर घसरला आहे.

जोश हेझलवूड पहिल्या क्रमांकाचा टी-20 गोलंदाज आहे. शाकिब अल हसन टी-20 अष्टपैलूंच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. हार्दिक पांड्याला एक स्थान गमवावे लागले असून त्याची सातव्या स्थानावर घसरण झाली आहे. अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबी अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे.