ICC T20 Ranking : विराट कोहलीला मागे टाकत बाबर आझमचा आणखी एक विक्रम

WhatsApp Group

ICC T20 Ranking : पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझम आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यांच्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये होणारी तुलना आता काही नवीन राहिली नाही. गेल्या काही महिन्यांपासून विराट कोहलीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ढासळलेला फॉर्म हा चर्चेचा विषय ठरलेला असतानाच बाबर आझमने आणखी एका निकषात विराट कोहलीला धोबीपछाड दिला आहे.

आयसीसीच्या टी-20 क्रमवारीत सर्वोच्च स्थानावर सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम आता बाबर आझमच्या नावावर जमा झाला आहे. विराट कोहली 1 हजार 13 दिवस अव्वल स्थानावर होता. परंतू बाबर आझमने आता हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. इतर भारतीय खेळाडूंच्या बाबतीत इशान किशनच्या क्रमवारीत दोन अंकांनी घसरण झाली असून सॅमसन आणि हुडाची क्रमवारी सुधारली आहे.

आयर्लंडविरुद्ध दोन टी-20 सामन्यात इशान किशनने 26 आणि 3 धावा केल्यामुळे याचा फटका त्याच्या क्रमवारीला बसला. ज्यामुळे तो सातव्या क्रमांकावर घसरला आहे. परंतू पहिल्या सामन्यात नाबाद 47 आणि दुसऱ्या सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या दिपक हुडाने मोठी झेप घेत क्रमवारीत 104 स्थान पटकावले आहे. संजू सॅमसनही आपल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 144 व्या स्थानावर पोहचला आहे.