ICC ODI Ranking Bowler: जसप्रीत बुमराह बनला नंबर 1 गोलंदाज, ICC ने जाहीर केली ताजी रँकिंग; पहा यादी

WhatsApp Group

ICC ODI Ranking Bowler: लंडनच्या ओव्हल मैदानावर इंग्लंडविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात अप्रतिम कामगिरी करणारा जसप्रीत बुमराह आता एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नंबर वन गोलंदाज बनला आहे. बुमराहने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 6 विकेट घेतल्या आणि आता तो जगातील नंबर वन गोलंदाज बनला आहे. त्याने न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्ट आणि पाकिस्तानच्या शाहिन आफ्रिदीला मागे टाकत पहिले स्थान मिळवले आहे. या सामन्यापूर्वी बुमराह तिसर्‍या स्थानावर होता, पण आता ट्रेंट बोल्ट पहिल्या स्थानावरून दुसऱ्या आणि शाहीन आफ्रिदी दुसऱ्या स्थानावरुन तिसऱ्या स्थानावर गेला आहे. बुमराहच्या खात्यात 718 रेटिंग गुण आहेत.

जसप्रीत बुमराह व्यतिरिक्त आयसीसी वनडे क्रमवारीत टॉप 10 गोलंदाजांमध्ये एकही भारतीय गोलंदाज नाही. त्याच्यापाठोपाठ भारताच्या युझवेंद्र चहलचा दुसरा क्रमांक लागतो, जो 20 व्या क्रमांकावर आहे. मोहम्मद शमी 23व्या तर भुवनेश्वर कुमार 24व्या स्थानावर आहे. अष्टपैलूंच्या क्रमवारीत अव्वल 10 मध्ये कोणीही नाही. रवींद्र जडेजाचे नाव 14 व्या क्रमांकावर आहे, तर त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही खेळाडूचा टॉप 20 मध्ये समावेश नाही.

एकदिवसीय सामन्यातील टॉप 10 गोलंदाज 

जसप्रीत बुमराह – 718 रेटिंग
ट्रेंट बोल्ट – 712 रेटिंग
शाहीन आफ्रिदी – 681 रेटिंग
जोश हेझलवुड – 679 रेटिंग
मुजीब उर रहमान – 676 ​​रेटिंग
मेहदी हसन – 675 रेटिंग
ख्रिस वोक्स – 673 रेटिंग
मॅट हेन्री – 672 रेटिंग
मोहम्मद नबी – 657 रेटिंग
राशिद खान – 651 रेटिंग