ICC ODI Rankings: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये आतापर्यंत 12 लीग सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये भारत, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका संघांनी आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याचा परिणाम आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या एकदिवसीय संघ क्रमवारीतही दिसून आला आहे. अहमदाबादच्या मैदानावर भारतीय संघाने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव करून मेगा टूर्नामेंटमध्ये सलग तिसरा विजय नोंदवला, तर क्रमवारीतही पहिले स्थान कायम राखले. एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात भारताचा पाकिस्तानविरुद्धचा हा सलग 8वा विजय ठरला.
भारत पहिल्या स्थानावर कायम
अहमदाबादमध्ये पाकिस्तानविरुद्ध भारताच्या एकतर्फी विजयानंतर आयसीसीने 14 ऑक्टोबर रोजी नवीनतम एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली. भारतीय संघ 118 रेटिंग गुणांसह पहिल्या स्थानावर कायम आहे, तर पाकिस्तान संघ 115 रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी दाखवणारा दक्षिण आफ्रिकेचा संघ 110 रेटिंग गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलिया अजूनही 109 रेटिंग गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. तर न्यूझीलंडचा संघ टॉप-5 मध्ये दाखल झाला असून 106 रेटिंग गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. तर एकदिवसीय विश्वचषकाचा गतविजेता इंग्लंड 105 रेटिंग गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.
विश्वचषकात उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत असलेल्या दक्षिण आफ्रिकेने आयसीसी क्रमवारीत सर्वात मोठी झेप घेतली आहे. आयसीसी क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला मागे टाकत तिसरे स्थान पटकावले आहे. ऑस्ट्रेलियाने विश्वचषकातील सुरुवातीचे दोन्ही सामने गमावले आहेत, त्यामुळे त्यांचे रेटिंगही घसरले आहे. ते तिसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानावर घसरले आहेत.
And still your No.1 ranked ODI team 🇮🇳
Latest changes in the @MRFworldwide ICC Men’s ODI Rankings ⬇️#CWC23 https://t.co/YDndILqqi3
— ICC (@ICC) October 15, 2023
हेही वाचा – रोहित शर्माने केला मोठा विक्रम, ख्रिस गेल आणि शाहिद आफ्रिदी पाहतच राहिले
एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या गुणतालिकेतही भारत अव्वल स्थानी
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये मैदानावर यजमान भारतीय संघाची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी दिसून आली आहे. 3 पैकी 2 सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी विरोधी संघाला पूर्णपणे नेस्तनाबूत केले होते. वर्ल्ड कप पॉईंट्समध्ये पाकिस्तानविरुद्धच्या मोठ्या विजयानंतर टीम इंडिया 3 सामन्यात 6 गुणांसह पहिल्या स्थानावर पोहोचली आहे, ज्यामध्ये नेट रन रेट 1.821 आहे.
हेही वाचा – World Cup 2023: बुमराहने वर्ल्ड कपमध्ये केला ‘हा’ मोठा विक्रम