विश्वचषकात भारताचा पहिल्यांदाच पाकिस्तानच्या हातून पराभव!

WhatsApp Group

दुबई – टी-20 विश्वचषक 2021 मधील ‘सुपर 12’ फेरीतील आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने भारताला 10 विकेट्सने पराभूत केले. या विजयासह पाकिस्तानने विश्वचषक स्पर्धेच्या इतिहास भारताला पहिल्यांदाच पराभूत करण्याची कामगिरी केली आहे. यापूर्वी झालेल्या एकाही विश्वचषक स्पर्धेच्या सामन्यात पाकिस्तान भारताला हरवू शकला नव्हता.

या सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकून गोलंदाजीचा करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने पाकिस्तानला विजयासाठी 152 धावांचे आव्हान दिले आहे. भारतासाठी कर्णधार विराट कोहलीने 49 चेंडूत 57 धावांची सर्वाच्च खेळी केली. तर रिषभ पंतनेही 39 धावांची खेळी केली. इतर एकाही भारतीय फलंदाजाला आपल्या नावाला साजेल अशी कामगिरी करता आली नाही.


शाहीन आफ्रिदीची भेदक गोलंदाजी

शाहीन आफ्रिदीने दमदार गोलंदाजी करत विराट कोहली, केएल राहुल आणि रोहित शर्मा या दिग्गजांना माघारी धाडले. त्याने 4 ओव्हरमध्ये 31 धावा देत भारताचे 3 मुख्य फलंदाज गारद केले.

बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांची धमाकेदार अर्धशतकी खेळी

भारतीय संघाने दिलेल्या 152 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानने दमदार सुरुवात करत हा सामना एकही विकेट न गमवता जिंकला.  पाकिस्तानसाठी कर्णधार बाबर आझमने 52 चेंडूत 68 तर मोहम्मद रिझवानने 55 चेंडूत 79 धावांची दमदार अर्धशतकी खेळी केली. भारताकडून एकाही गोलंदाजाला विकेट घेण्यात यश आले नाही.

पाकिस्तान संघाने रचला नवा इतिहास

आजवर खेळल्या गेलेल्या भारत-पाक वनडे आणि टी-20 विश्वचषकातील सामन्यांमध्ये पाकिस्तानी संघाचा भारताविरुद्ध हा पहिलाच विजय ठरल्याने पाकसाठी या विजयाला विशेष महत्व मिळलं आहे. या सामन्यापूर्वी आजवर दोन्ही संघात विश्वचषक स्पर्धांमध्ये १२ सामने खेळले गेले होते आणि सर्व सामन्यात पाकिस्तानला पराभूत व्हावे लागले होते.

आजच्या सामन्यासाठी अशी होकी भारत आणि पाकिस्तान संघाची ‘प्लेईंग XI’

 

भारत – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी .

पाकिस्तान – बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फखर जमान, आसिफ अली, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, हरीस रौफ, शाहीन आफ्रिदी.