जसप्रीत बुमराहची ICC कसोटी क्रमवारीत मोठी झेप, कोहली-जडेजाला बसला फटका

WhatsApp Group

भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने Jasprit Bumrah बुधवारी ICC द्वारे जारी केलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत ICC Latest Test Rankings पहिल्या पाच गोलंदाजांमध्ये स्थान मिळवले आहे. बुमराह 830 गुणांसह सहा स्थानांनी झेप घेत चौथ्या स्थानावर आला आहे. दुसरीकडे, फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहली 9व्या स्थानावर घसरला असून अष्टपैलूंच्या क्रमवारीत रवींद्र जडेजा दुसऱ्या स्थानावर घसरला आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या बंगळुरू कसोटीत जसप्रीत बुमराहने एकूण 8 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यामुळे त्याने पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदी, काइल जेमिसन, टिम साउथी, जेम्स अँडरसन, नील वॅगनर आणि जोश हेझलवूड यांना मागे टाकून चौथ्या स्थानी पोहोचला आहे.


दुसरीकडे, श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्नेने तीन स्थानांनी झेप घेत फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल 5 मध्ये पोहोचला आहे. भारताविरुद्धच्या बंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या डावात करुणारत्नेने शतक झळकावले पण तो संघाला पराभवापासून वाचवू शकला नाही. करुणारत्नेचे हे कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंग आहे. तो आता मार्नस लॅबुशेन, जो रूट, स्टीव्ह स्मिथ आणि केन विल्यमसन यांच्यासोबत टॉप 5 मध्ये आहे.