IND VS NZ: भारताने केली न्यूझीलंडची शिकार! विजयाची हॅट्ट्रिक करत आता सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाशी होणार लढत

WhatsApp Group

२०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील गट टप्प्यातील शेवटचा सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने ५० षटकांत ९ गडी गमावून २४९ धावा केल्या. प्रत्युत्तरात, न्यूझीलंडचा संघ ४५.३ षटकांत २०५ धावांवर आटोपला. भारताने हा सामना ४४ धावांनी जिंकला. आता उपांत्य फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होईल.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर भारताची सुरुवात खूपच खराब झाली. ३० धावांपर्यंत रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली पॅव्हेलियनमध्ये परतले होते. विराटच्या एकदिवसीय कारकिर्दीतील हा ३०० वा सामना होता ज्यामध्ये तो फक्त ११ धावा करून बाद झाला होता. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल फलंदाजीला आले आणि त्यांनी डावाची जबाबदारी घेतली. दोघांमध्ये ९८ धावांची भागीदारी झाली.

अय्यर ९८ चेंडूत ७९ धावा काढून बाद झाला, तर अक्षरने ६१ चेंडूत ४२ धावा केल्या. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला केएल राहुल काही खास कामगिरी करू शकला नाही आणि २९ चेंडूत २३ धावा करून बाद झाला. हार्दिक पांड्याने शेवटच्या षटकात जलद धावा काढल्या. हार्दिक ४५ धावा करून बाद झाला. गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर, न्यूझीलंडकडून सर्वात यशस्वी गोलंदाज मॅट हेन्री होता, त्याने ८ षटकांत ४२ धावा देत ५ बळी घेतले. भारताकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक धावा केल्या.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती.

न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन : मिचेल सँटनर (कॅप्टन), विल यंग, ​​रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मॅट हेन्री, काइल जेमिसन आणि विल्यम ओरुर्के.