IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख ठरली, लाहोरमध्ये होणार सामना?

WhatsApp Group

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1 मार्च रोजी सामना खेळवला जाऊ शकतो. याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. एका वृत्तानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारत आणि पाकिस्तान सामन्याची तारीख आणि ठिकाण निश्चित केले आहे. पीसीबीने भारत-पाक सामना लाहोरमध्ये आयोजित करण्याची योजना आखली आहे. मात्र, याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन पाकिस्तानमध्ये होणार आहे. मात्र संघ भारतात जाणार की नाही याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 1 मार्च रोजी लाहोरमध्ये होणार आहे. ही स्पर्धा 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान खेळवली जाणार आहे.  या स्पर्धेचा अंतिम सामना 9 मार्च रोजी होणार आहे. पीसीबीने या स्पर्धेसाठी विशेष तयारी केली आहे.

टीम इंडियाचे सर्व सामने लाहोरमध्ये होऊ शकतात 

रिपोर्टनुसार, पीसीबी चेअरमन मोहसिन नक्वी टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या अंतिम सामन्यासाठी बार्बाडोसमध्ये होते. त्याने आयसीसीला १५ सामन्यांचे वेळापत्रक दिले आहे. टीम इंडियाचे सर्व सामने लाहोरमध्ये होणार आहेत. येथे कडक सुरक्षा व्यवस्था असणार आहे. लाहोरमध्ये सात सामने खेळवले जाणार आहेत. तीन सामने कराचीत होणार आहेत. यासोबतच रावळपिंडीत पाच सामने खेळवले जाणार आहेत.

अंतिम सामना लाहोरमध्ये खेळवला जाईल 

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा पहिला सामना कराचीमध्ये होऊ शकतो. यासोबतच उपांत्य फेरीचा सामनाही होऊ शकतो. रावळपिंडीत उपांत्य फेरीचा सामना खेळवला जाऊ शकतो. तर अंतिम सामना लाहोरमध्ये होऊ शकतो. टीम इंडियाला याच शहरात ठेवण्याची योजना आहे.

भारत-पाकिस्तान अ गटात

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दोन गट तयार करण्यात आले आहेत. यामध्ये भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेश यांना अ गटात ठेवण्यात आले आहे. तर ब गटात ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि अफगाणिस्तान हे संघ असतील.