T20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ दिवशी भारत-पाकिस्तान येणार आमने-सामने

WhatsApp Group

आयसीसीने T20 विश्वचषक 2022 T20 World Cup 2022 schedule चे वेळापत्रक जाहीर केले आहे. 2022 च्या T20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्याची तारीखही समोर आली आहे. 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर T20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. हा T20 विश्वचषक ऑस्ट्रेलियात खेळण्यात येणार आहे.

टीम इंडियाला बदला घेण्याची संधी

गेल्या वेळी UAE मध्ये झालेल्या T20 विश्वचषक 2021 मध्ये, पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता आणि टीम इंडियाला उपांत्य फेरीपूर्वी स्पर्धेतून बाहेर पडावे लागले होते. अशा स्थितीत भारताकडे पाकिस्तानचा बदला घेण्याची संधी मिळाली आहे.

T20 विश्वचषकाचा अंतिम सामना हा 13 नोव्हेंबरला मेलबर्नच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. तर उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट ग्राउंड आणि अ‍ॅडलेड ओव्हल येथे होतील.

16 ऑक्टोबरपासून सुरू होणार T20 विश्वचषक 2022

T20 विश्वचषक 2022, 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात होणार आहे. अ‍ॅडलेड, ब्रिस्बेन, गिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात ठिकाणी खेळवला जाईल. या स्पर्धेत एकूण 16 संघ 45 सामने खेळणार आहेत.

गट 1 – इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान
गट 2 – भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांग्लादेश


23 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान

पहिल्या फेरीच्या निकालानंतर या 8 संघांव्यतिरिक्त आणखी 4 संघ सुपर 12 मध्ये पोहोचतील. सुपर 12 च्या पहिल्या सामन्यात गतविजेता आणि यजमान ऑस्ट्रेलियाचा सामना 22 ऑक्टोबरला न्यूझीलंडशी होणार आहे. तर टीम इंडिया 23 ऑक्टोबरला पाकिस्तानशी भिडणार आहे.

T20 विश्वचषक 2022 मध्ये भारताचे सामने

  • पहिला सामना – भारत विरुद्ध पाकिस्तान – 23 ऑक्टोबर, मेलबर्न
  • दुसरा सामना – भारत विरुद्ध अ गट उपविजेता – 27 ऑक्टोबर, सिडनी
  • तिसरा सामना – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – 30 ऑक्टोबर, पर्थ
  • चौथा सामना – भारत विरुद्ध बांगलादेश – 2 नोव्हेंबर, अ‍ॅडलेड
  • पाचवा सामना – भारत विरुद्ध गट ब विजेता – 6 नोव्हेंबर, लबर्न