यापुढे मी लोकसभा लढविणार नाही, सुशीलकुमार शिंदेंचा मोठा निर्णय

WhatsApp Group

सोलापूर: काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय सुशीलकुमार शिंदे Sushilkumar Shinde यांनी यापुढे लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याती घोषणा केली आहे. भारतात काँग्रेस पक्षाला 137 वर्षे पूर्ण झाले. त्या स्थापना दिनानिमित्त सोलापूरात काँग्रेस भवनामध्ये ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान आपण यापुढे लोकसभा लढविणार नाही, पण पक्षात सक्रिय राहणार आहे. असं सुशीलकुमार शिंदे म्हणालेत.