मुंबई – भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी आज थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष केलं आहे. किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये ”शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या धमक्यांना आम्ही नाही घाबरत, धमक्या कोणाला देता?” असे म्हटलं आहे. महाराष्ट्रातील जनता घोटाळेबाजांना शिक्षा देणारचं असं म्हणाले आहेत.
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा धमक्यांना आम्ही घाबरत नाही.
धमकी कोणाला !?
सुप्रिम कोर्टला, हायकोर्टला, ईडीला, भाजपाला की किरीट सोमैयांना !!?
फक्त अनिल देशमुख नाही, जितेंद्र आव्हाडांची पण अटक झाली, आनंद अडसूळ यांची पण अटक झाली
महाराष्ट्राची जनता घोटाळेबाजांना सजा देणारच pic.twitter.com/DDvbt8PTjb
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 18, 2021
राज्यातील महाविकास आघाडीचे काही नेते ईडीच्या रडारवर आहेत असून सध्या महाराष्ट्रात ईडीकडून धाडसत्र सुरूच आहेत. त्यातच भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी महविकास आघाडीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केल्याने पुन्हा चर्चेला उधाण आलं आहे.
अनिल देशमुखच नाही तर जितेंद्र आव्हाड आणि आनंद अडसूळ यांनाही अटक झाली होती. असंही किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय.