इंडियन प्रीमियर लीग IPL च्या 15 व्या हंगामातील पाचवा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद Hyderabad vs Rajasthan यांच्यात खेळला गेला. राजस्थान रॉयल्सने हा सामना 61 धावांनी जिंकत 2022 आयपीएलमधील आपल्या पहिल्याच सामन्यात दमदार विजय मिळवला आहे Rajasthan won by 61 runs. राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादसमोर विजयासाठी 211 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. मात्र सनरायझर्स हैदराबाद संघाला 7 बाद 149 धावांवर समाधान मानावे लागले.
या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. राजस्थान रॉयल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 गडी गमावून 211 धावा केल्या. राजस्थान संघाकडून खेळताना कर्णधार संजू सॅमसने sanju samson सर्वाधिक 55 धावा केल्या. हैदराबादसाठी उमरान मलिक आणि टी. नटराजन यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
Match: 1
Points: 2 ????#दिलसेरॉयल | #TATAIPL2022 | #SRHvRR pic.twitter.com/VmaHAUplLZ— Rajasthan Royals (@rajasthanroyals) March 29, 2022
दुसरीकडे 211 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघाची सुरुवात खराब झाली. सनरायझर्स हैदराबाद संघाकडून मार्करामने चांगली फटकेबाजी करत 57 धावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र गी खेळी संघाला विजय मिळवून देण्याएवढी पुरेशी नव्हती. राजस्थान रॉयल्सकडून गोलंदाजी करताना युजवेंद्र चहलने 22 धावा देत सर्वाधिक 3 बळी घेतले तर ट्रेंट बोल्ट आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.
अशी होती दोन्ही संघाची प्लेइंग XI
सनरायझर्स हैदराबाद – अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, केन विल्यमसन (कर्णधार), निकोलस पूरन, एडन मार्कराम, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन, उमरान मलिक, वॉशिंग्टन सुंदर, रोमॅरियो शेफर्ड.
राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रवीचंद्रन अश्विन, नॅथन कुल्टर-नाईल, यजुर्वेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट, प्रसिध कृष्णा.