केन विल्यमसन IPL 2022 अर्ध्यावर सोडून न्यूझीलंडला परतला

WhatsApp Group

IPL 2022 मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध विजय मिळवल्यानंतर सनरायझर्स हैदराबादचा (SRH) कर्णधार केन विल्यमसनने मोठा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडचा कर्णधार विल्यमसन आयपीएल 2022 सोडून मायदेशी रवाना झाला आहे Kane Williamson is flying back to New Zealand. विलियम्सन त्याच्या दुसऱ्या अपत्याच्या जन्मासाठी न्यूझीलंडला परतत आहे. सनरायझर्स हैदराबादने ट्वीट करत याची माहिती दिली आहे. मुंबई विरुद्धच्या विजयानंतर हैदराबादच्या प्लेऑफच्या आशा अजूनही जिवंत आहेत. मात्र SRH टॉप-4 मध्ये जाणार की नाही हे बाकी संघांच्या निकालावर आणि नेटरनरेटवर अवलंबून असणार आहे.

सनरायझर्स हैदराबादला 22 मे रोजी पंजाब किंग्जविरुद्ध शेवटचा सामना खेळायचा आहे आणि विल्यमसनच्या अनुपस्थितीत हैदराबादचा कर्णधार कोण असेल याबाबत हैदराबाद फ्रँचायझीने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. हैदराबाद संघाने या मोसमात आतापर्यंत 13 सामन्यांत सहा सामने जिंकले असून सात पराभव पत्करले आहेत. संघ अजूनही आठव्या क्रमांकावर असून प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. जर हैदराबादने प्लेऑफमध्ये स्थान मिळवले तर केन विल्यमसन आयपीएलमध्ये खेळण्यासाठी पुन्हा भारतात परतणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.