SRH vs MI: टीम डेव्हिडचे प्रयत्न व्यर्थ! हैदराबादचा मुंबईवर थरारक विजय!

WhatsApp Group

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) मध्ये मंगळवारी मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद SRH vs MI यांच्यात सामना खेळला गेला. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्सने चमकदार कामगिरी करत मुंबई इंडियन्ससमोर 194 धावांचे लक्ष्य ठेवले होते.

194 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा व इशान किशन यांनी दमदार सुरूवात करून दिली. पण, उम्रान मलिकने त्यांची दाणादाण उडवली. टीम डेव्हिडने 18 चेंडूंत 46 धावा करत मुंबईला सामना जवळ आणून दिला. पण, त्याची विकेट पडली अन् भुवनेश्वर कुमारने 19वे षटक निर्धाव फेकून मॅच फिरवली. हैदराबादने 3 धावांनी सामना जिंकून प्ले ऑफच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले आहे.

सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 194 धावांचे लक्ष्य ठेवले होते. हैदराबादच्या संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 गडी गमावून 193 धावा केल्या. हैदराबादकडून राहुल त्रिपाठीने सर्वाधिक 76 धावा केल्या. तर प्रियम गर्ग (42) आणि निकोलस पूरन (38) यांनी वेगवान खेळी खेळली. मुंबईकडून रमणदीप सिंगने 3 बळी घेतले.

मुंबईकडून फलंदाजी करताना कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी दमदार सुरुवात करून दिली. रोहित शर्मा 36 चेंडूत 48 धावा करत झेलबाद झाला. मुंबई इंडियन्सला इशान किशनच्या रुपात दुसरा झटका बसला आहे. इशान किशनने 34 चेंडूत 43 धावा करत माघारी परतला

टीम डेव्हिडचे प्रयत्न व्यर्थ! – तिलक वर्माच्या रुपात मुंबईचा तिसरा खेळाडू बाद झाला. तिलक वर्माने अवघ्या आठ धावा केल्या. डॅनियल सॅम्सच्या रुपात मुंबईला चौथा मोठा झटका बसला. सॅम्सला चांगल्या धावा करता आल्या नाही. सॅम्स अवघ्या 15 धावांवार बाद झाला. त्यानंतर टिम डेव्हिडने दमदार फटकेबाजी केली मात्र मुंबईला या सामन्यात विजय मिळवता आला नाही. मुंबईचा हा या मोसमातील 10वा पराभव आहे. टिम डेव्हिडने 18 चेंडूत 46 धावांची वादळी खेळी केली, त्याच्या या खेळीत 3 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता.