बुलडाणा – दीड वर्षापूर्वी प्रेमविवाह झालेल्या कोथळी येथील एका दाम्पत्याने शेतात एकाचवेळी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ९ फेब्रुवारीला दुपारी बाराच्या दरम्यान इब्राहिमपूर शिवारामध्ये ही घटना समोर आली.
सुखी संसार सुरू असताना दोघांनी हे टोकाचे पाऊल का उचलले? याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही. शिवशंकर रामभाऊ शिरकरे (२६) व कल्पना शिवशंकर शिरकरे (३५) अशी त्या दोघा पती-पत्नीची नावे असून ते मोताळा तालुक्यातील कोथळी येथील रहिवासी आहेत.
हेही वाचा – ‘पुष्पा’ फेम रश्मिका ठरली Oops मोमेंटची शिकार! फोटो होतोय व्हायरल
या घटनेची माहिती विजय शिरकरे याने बोराखेडी पोलिसांत दिली. ठाणेदार ममताबादे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय यशवंत तायडे हे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.
मृतदेह शवविच्छेदना करिता पाठविण्यात आले असून. दोघांनी आत्महत्या का केली, याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
हेही वाचा – 24 तासांत 919 पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवत लिसा स्पार्कने रचला विचित्र विक्रम