पुण्यात शेकडो विद्यार्थ्यांनी केलं आंदोलन, ‘MPSC’ कडे केली ‘ही’ मागणी

WhatsApp Group

पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अनागोंदी कारभाराविरोधात एमपीएससी स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे. पुण्यातील विद्यार्थ्यांनी (Pune Students strike) अलका टॉकीज चौकामध्ये एमपीएससी आयोगाविरोधात आंदोलन सरु केलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020 या परीक्षेच्या पूर्वपरीक्षेतील (Preliminary Examination) काही प्रश्न रद्द झाले. त्यानंतर एमपीएससी आयोगाविरोधात विद्यार्थ्यांनी न्यायालयामध्ये धाव घेतली आहे.

त्यामुळे या परीक्षेची मुख्य परीक्षा गेल्या तीन महिन्यांपासून रखडली आहे. या पार्श्वभूमीवर शेकडो विद्यार्थ्यांनी एमपीएससी विरोधात आंदोलन केले. एमपीएससीने (MPSC) या गंभीर विषयावर तो़डगा काढावा,अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. आंदोलनस्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्तही लावण्यात आलाय.

आयोगाने जे प्रश्न बरोबर होते, ते बरोबर द्यावेत व फेर निकाल लावून परीक्षा लवकरात लवकर घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केलीय. दरम्यान, विद्यार्थ्यांनी आंदोलन मागं घेतलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.