माणुसकी मेली..! एक्सप्रेसवेवर महिलेच्या मृतदेहाला अनेक वाहनांनी चिरडलं

WhatsApp Group

Agra-Lucknow Expressway Accident: उत्तर प्रदेशातील आग्रा-लखनौ एक्सप्रेसवेवर एका महिलेचा मृतदेह कित्येक तास रस्त्यावर पडून होता आणि यादरम्यान अनेक वाहने मृतदेहावरून जात राहिली. ही घटना रविवारी घडली. वाहनांनी मृतदेहाचा एवढा चुराडा केला की, शरीराचे अवयव रस्त्यावर विखुरले गेले. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये शरीराचे तुकडे तुकडे रस्त्यावर पसरलेले दिसले.

वाहनांनी मृतदेहाचा एवढा चुराडा केला की, शरीराचे अवयव रस्त्यावर विखुरले गेले. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये विकृत मृतदेह आणि शरीराचे तुकडे तुकडे रस्त्यावर पसरलेले दिसले. पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. मृताची ओळख पटलेली नाही.

पोलीस येण्यापूर्वी मृतदेह किती वेळ एक्स्प्रेस वेवर पडून होता, हे अद्याप समजू शकलं नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. हे प्रकरण फतेहाबाद पोलीस ठाण्याचं आहे.

त्याचवेळी आग्रा येथे आणखी एका रस्ता अपघातात 12 जण जखमी झाले आहेत. फतेहपूर सिक्री परिसरात ट्रकने अचानक ब्रेक लावल्याने मागून येणाऱ्या लोडरने ट्रकला धडक दिली. लोडरमध्ये बसलेल्या डझनभर लोकांमध्ये आरडाओरडा झाला. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. लोडरमधील सर्व लोक राजस्थानमधील डीग जिल्ह्यातील सोनगाव येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. गामीमध्ये सहभागी होण्यासाठी सर्वजण फतेहपूर सिक्री येथे येत होते.