HSC Exam Paper Leak; बारावीचा पेपर फुटला; कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाला अटक

WhatsApp Group

मुंबई – राज्यात पेपरफुटीचे प्रकरण थांबण्याची चिन्हं दिसत नाही. बारावी बोर्डाचा केमिस्ट्रीचा पेपर फुटला असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या प्रकरणी आता विलेपार्ले पोलिसांनी मालाड मधील एका खासगी कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाला अटक केली आहे. या शिक्षकाने बारावी केमिस्ट्रीचा पेपर आपल्या विद्यार्थ्यांना दिला असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यात याआधीही राज्य सरकारच्या नोकरभरतीमधील पेपरफुटी झाल्याचे समोर आलं होतं. आता, थेट बारावीच्या परीक्षेचा पेपर फुटला असल्यामुळे खळबळ उडाली आहे. शनिवारी बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर झाला होता. मात्र, परीक्षेपूर्वी हा पेपर विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर पाठवण्यात आला होता.

मालाडमधील खाजगी क्लासेसच्या शिक्षकाला या प्रकरणात विलेपार्ले पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. मुकेश यादव असे या खाजगी क्लासेस चालवणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. या खाजगी शिक्षकाने आपल्या वर्गात शिकत असलेल्या तीन विद्यार्थ्यांना व्हाट्स अॅपवर हा पेपर परीक्षा सुरू होण्याआधीच दिला असल्याची माहिती समोर आली आहे.