VIDEO: लग्नाच्या मंडपात पोहोचताच रडू लागली हृता, लग्नातील भावुक क्षण आले समोर

WhatsApp Group

‘मन उडू उडू झालं’ आणि ‘फुलपाखरू’  या लोकप्रिय मालिकांमधून अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) घराघरामध्ये पोहोचली आहे. हृताचा फार मोठा चाहतावर्ग आहे. या अभिनेत्रीला अनेक लोक महाराष्ट्राची क्रशदेखील म्हणतात. उत्कृष्ट अभिनय आणि आपल्या अप्रतिम सौंदर्याच्या जोरावर ही अभिनेत्री तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे.

चाहते अभिनेत्रीबाबत जाणून घ्यायला नेहमीच उत्सुक असतात. दरम्यान अभिनेत्रीने गुपचूप लग्नगाठ (Hruta-Parteeks Secret Wedding) बांधत सर्वानांच सुखद धक्का दिला आहे. सध्या सोशल मीडियावर हृताचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये अभिनेत्री भावुक झालेली पाहायला मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajshri Marathi (@rajshrimarathi)

गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांना हृता दुर्गुळेच्या लग्नाची उत्सुकता लागून होती.अभिनेत्री लग्न कधी करतेय? तिचा वेडिंग लुक कसा असेल? हे सर्व जाणून घेण्यासाठी चाहते आतुर होते. आता ही प्रतीक्षा संपली आहे. हृताने काल म्हणजेच 18 मे रोजी बॉयफ्रेंड आणि दिग्दर्शक प्रतीक शाहसोबत मुंबईत लग्नगाठ बांधली आहे. अभिनेत्रीने गुपचूप लग्न करत सर्वानांच चकित केलं आहे. सध्या सोशल मीडियावर हृता आणि प्रतीकच्या लग्नाचे अनेक फोटो आणि काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत.