अभिनेत्री हृता दुर्गुळे अडकली विवाहबंधनात, प्रतीक शाहसोबत थाटला ‘संसार’

WhatsApp Group

‘फुलपाखरू’ फेम अभिनेत्री हृता दुर्गुळे नुकतीच लग्नाच्या बेडीत अडकली आहे. हृताने डिसेंबर महिन्यात बॉयफ्रेंड प्रतीक शाहसोबत साखरपुडा केला होता. त्यानंतर आता या दोघांनी नुकतीच लग्नागाठ बांधली असून या दोघांच्या लग्नाचा पहिला फोटो समोर आले आहेत. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर वायरल होत आहेत. सोशल मीडियावरून हृता आणि प्रतीक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hruta Durgule (@hruta12)

हृता दुर्गुळेनी इन्स्टाग्रामवर लग्नातील फोटो शेअर केले आहेत. तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. हृताच्या चाहत्यांनी तिच्या फोटोवर कमेंट करत तिला तिच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hruta Durgule (@hruta12)

हृता दुर्गुळेनं काही महिन्यांपूर्वीच एका मुलाखतीमध्ये आपल्या प्रेमाची कबुली देत बॉयफ्रेंड प्रतीक शहाची ओळख करून दिली होती. प्रतीक हा हिंदी टीव्ही क्षेत्रात कार्यरत असून त्याची आई मुग्धा शहा या मराठी आणि हिंदी टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. हृता आणि प्रतीक यांचा साखरपुडा २५ डिसेंबर २०२१ रोजी पार पडला होता. त्यानंतर हे दोघं लग्न कधी करणार याकडेच चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं होतं.