Credit card limit: क्रेडिट कार्डातील पैसे वापरण्याची लिमिट कशी वाढवाल? ‘या’ महत्त्वाच्या टिप्स फॉलो करा

WhatsApp Group

Credit card limit: क्रेडीट कार्डची लिमिट ठरवताना बँकांकडून ग्राहकाचे वय, वार्षिक उत्पन्न, विद्यमान कर्ज आणि तुमची नोकरी याबाबत माहिती घेतली जाते. यात सिबील स्कोअर महत्वाचा ठरतो. जर तुम्ही पहिल्यांदाच क्रेडीट कार्ड घेणार असाल आणि तुमच्या नावे कोणतेही क्रेडीट नसल्यास तुम्हाला कमी खर्च मर्यादेचे क्रेडीट कार्ड मिळू शकते.

बँकेकडून बचत खातेदार, सॅलरी अकाउंट तसेच चालू खात्याच्या ग्राहकांना क्रेडीट कार्ड इश्यू केले जाते. क्रेडीट कार्डवरील खर्चाची मर्यादा ही बँकेकडून तुमच्या उत्पन्नानुसार ठरवली जाते. मात्र खर्चाची मर्यादा तुम्ही नंतर देखील वाढवू शकता. उत्पन्न मर्यादा वाढवण्यासाठी स्वत:ला काही नियम घातले तर हे काम सोपे होऊ शकते.

क्रेडीट कार्डची लिमिट ठरवताना बँकांकडून ग्राहकाचे वय, वार्षिक उत्पन्न, विद्यमान कर्ज आणि तुमची नोकरी याबाबत माहिती घेतली जाते. यात सिबील स्कोअर महत्वाचा ठरतो. जर तुम्ही पहिल्यांदाच क्रेडीट कार्ड घेणार असाल आणि तुमच्या नावे कोणतेही क्रेडीट नसल्यास तुम्हाला कमी खर्च मर्यादेचे क्रेडीट कार्ड मिळू शकते.

हेही वाचा – Education Loan: शैक्षणिक कर्ज काय असते? ते कोणाला मिळू शकते? संपूर्ण माहिती येथे वाचा…

सुरुवातीला ग्राहकाला देण्यात आलेले कमी खर्च मर्यादेचे क्रेडीट कार्ड हे कायम स्वरुपी नसते. यात खर्चाची मर्यादा चांगल्या प्रकारे वापरली. वेळच्यावेळी त्याचा बँकेला परतावा केला तर यावरुन बँक तुमचे क्रेडीट लिमिट वाढवू शकते. क्रेडीट लिमिट वाढवण्यासाठी तुम्हाला काही महत्वाचे नियम पाळणे आवश्यक आहे.

क्रेडीट कार्डचा नियमित वापर करा

तुमची मासिक बिले भरण्यासाठी तुम्ही क्रेडीट कार्डचा नियमित वापर करायला हवा. क्रेडीट कार्ड लिमिटचा पुरेपूर वापर करणे आणि त्याची मुदतीपूर्व परत फेड करणे ग्राहकासाठी जमेची बाजू ठरू शकते. तुमची आर्थिक शिस्त आणि क्रेडीट कार्डचा वापर पाहून बँक स्वत:हून तुमचे क्रेडिट लिमिट वाढवू शकते.

तुमचे उत्पन्न वाढल्यास बँकेला माहिती  द्या

तुमचे मासिक उत्पन्न वाढले असल्यास त्याची अपडेट तुम्ही बँकेला देऊ शकता. उत्पन्न वाढणारे पुरावे जसे की सॅलरी स्लीप किंवा इन्कम टॅक्स रिटर्न सादर करुन तुम्ही बँकेला क्रेडिट लिमिट वाढवण्याची रिक्वेस्ट करु शकता. वाढीव उत्पन्नाच्या तुलनेत बँकेकडून तुमच्या क्रेडीट लिमिटचा आढावा घेतला जाईल आणि त्यानुसार क्रेडीट लिमिट वाढवून दिले जाईल.

हेही वाचा – SIP Investment Missed : एक महिन्याचा SIP हप्ता भरला नाही तर काय होईल? जाणून घ्या…

क्रेडीट कार्डचे बिल वेळेत भरा

क्रेडीट कार्डने खर्च करताना माणसाला भान राहत नाही मात्र खर्च केलेले पैसे बँकेला परत करताना तारांबळ उडते. यामुळे 45 दिवसांत सर्वच पैसे परत करताना अडचणीत येऊ शकता. त्यामुळे शक्यतो क्रेडीट कार्डचे बिल वेळेत भरा. ज्यामुळे विलंब शुल्काचा भुर्दंड, दंडाचे व्याज टाळता येईल. तसेच सिबिल स्कोअर खराब होणार नाही.

नवीन क्रेडीट कार्डाची मागणी करु शकता

तुमचे उत्पन्न वाढले असल्यास आणि विद्यामान क्रेडीट लिमिटची मर्यादा अपुरी वाटत असल्यास तुम्ही बँकेकडे नवीन क्रेडीट कार्डसाठी अर्ज करु शकता. तुमची क्रेडीट कार्ड हिस्ट्री स्वच्छ असेल तर बँकेकडून विनाविलंब नवे क्रेडीट कार्ड इश्यू केले जाईल. तुम्हाला नवीन कार्डसाठी अर्ज करताना अडचण येणार नाही.