आजच्या काळात आधार कार्ड हे एक महत्त्वाचे दस्तावेज आहे. पण आधार कार्डवरील फोटोमुळे बहुतांश लोक नाराज होतात. अनेकवेळा आधार कार्डवरील फोटोवरून लोकांची चेष्टाही उडते. तुम्हीही तुमच्या आधार कार्डवरील फोटोमुळे नाखुश असाल तर तुम्ही तो फोटो बदलू शकता how to change photo on aadhar card.
UIDAI ने आता फोटो अपडेट करण्याची परवानगी दिली आहे
खरं तर, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण Unique Identification Authority of India (UIDAI) आधार कार्डधारकांना त्यांचे फोटो अपडेट करण्याची परवानगी देते. कार्डधारक हे जवळच्या आधार नोंदणी केंद्राला भेट देऊन करू शकतात.
हेही वाचा – शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! PM Kisanच्या ११व्या हप्त्याबाबत केंद्र सरकारने दिली ‘ही’ माहिती
फोटो बदलण्यासाठी जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया आहे
- सर्व प्रथम UIDAI uidai.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या आणि आधार नोंदणी फॉर्म डाउनलोड करा.
- आधार नोंदणी फॉर्म भरा आणि जवळच्या आधार नोंदणी केंद्रात जाऊन सबमिट करा.
- आधार नोंदणी केंद्रावर तुमचा बायोमेट्रिक तपशील घेण्यात घेईल.
- यानंतर आधार नोंदणी केंद्राचा कर्मचारी तुमचा फोटो घेईल.
- आता फी म्हणून २५ रुपये आणि जीएसटी भरावा लागेल.
- यानंतर, आधार नोंदणी केंद्राचे कर्मचारी तुमचा फोटो अपडेट करतील आणि तुम्हाला URN सह स्लिप देतील.
- या URN द्वारे तुम्ही तुमचा आधार कार्ड फोटो बदलला आहे की नाही हे तपासू शकाल.
- आधार कार्ड फोटो अपडेट केल्यानंतर, अपडेट केलेले आधार कार्ड UIDAI वेबसाइटवरून डाउनलोड केले जाऊ शकते.
हेही वाचा – जगातील सर्वात उंच इमारतीवर चढली ‘ही’ महिला, धोकादायक स्टंट पाहून लोक झाले अवाक