Ladki Bahin Yojana 2024 : लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची नवीन प्रक्रिया, अर्ज करा मोबाईलवरूनच फक्त 5 मिनिटात

WhatsApp Group

Ladki Bahin Yojana 2024 : राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाने 28 जून 2024 रोजी मान्यता दिली. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिना रु. 1,500/- असा आर्थिक लाभ DBT द्वारे देण्यात येणार येतो.

राज्यातील अनेक अशा लाखो महिला आहेत ज्यांनी या योजनेसाठी आतापर्यंत अर्ज केला नाहीय. आज आपण या योजनेचा लाभ घेण्यासाठी कशाप्रकारे ऑफलाईन आणि ऑनलाईन अर्ज करता येईल त्याची संपूर्ण माहिती घेऊया.

अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार?

आधार कार्ड अर्जामध्ये आधारकार्ड प्रमाणे नाव नमुद करावे

अधिवास प्रमाणपत्र
प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे (15 वर्षापूर्वीचे रेशनकार्ड/15 वर्षा पूर्वीचे मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला) यापैकी कोणतेही एक.

महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे
(15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड / 15 वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला/अधिवास प्रमाणपत्र) यापैकी कोणतेही एक.

वार्षिक उत्पन्न – रु. 2.50 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक

पिवळी अथवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.

शुभ्र शिधापत्रिका असल्यास अथवा कोणतीही शिधापत्रिका नसल्यास वार्षिक उत्पन्न रु. 2.50 लाखापर्यंत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक.

नवविवाहितेच्या बाबतीत

रेशानकार्डवर तिच्या नावाची नोंद नसल्यास विवाह प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहितेच्या पतीचे रेशनकार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य राहील.

बँक खाते तपशील
(खाते आधार लिंक असावे)

लाभार्थी महिलेचे हमीपत्र व फोटो

ऑफलाईन अर्ज कसा करावा?

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा आहे पण तुमच्या जवळ मोबाईल फोन नाही किंवा तुम्हाला या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येत नाही त्यासंदर्भात तुम्ही खालील दिलेल्या प्रक्रियेनुसार तुम्ही स्वतःचा Offline अर्ज सादर करू शकतात, त्याची प्रक्रिया खालील प्रमाणे

लाडकी बहीण योजनेचा ऑफलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला योजनेचा अर्ज फॉर्म झेरॉक्स सेंटरवरून घ्यावा लागेल.
त्यानंतर योजनेसाठी लागणारे सर्व आवश्यक कागदपत्रे तयार करून घ्यावे
आता तुम्हाला तुमच्या जवळच्या ग्रामपंचायत/सेतू केंद्र/अंगणवाडी केंद्र/महिला व बालकल्याण विभाग या कोणत्याही एका ठिकाणी जाऊन या योजनेसाठी तुम्ही ऑफलाइन अर्ज सादर करू शकता
वरील कार्यालयाच्या अधिकाऱ्याद्वारा आपले अर्ज योजनेच्या अधिकृत पोर्टल मार्फत ऑनलाईन केले जाईल
तुम्ही काही दिवसानंतर कार्यालयाला त्यांना भेट देऊन अर्जाची पावती घेऊ शकता
अशाप्रकारे तुम्ही या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज सादर करू शकता.

मुख्यमंत्री माझी लाडकी पण योजनेसाठी तुम्ही अर्ज करत असाल तर तुम्हाला सर्वात पहिले योजनेच्या पोर्टलची युजर आयडी पासवर्ड तयार करावी लागेल त्याची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.

सर्वात प्रथम तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाईट पोर्टलवर ( https://ladakibahin.maharashtra.gov.in/ ) जावावे लागेल
तुमच्यासमोर अधिकृत वेबसाईट पोर्टलचा होमपेज ओपन होईल
होमपेज वर तुम्हाला वरच्या भागांमध्ये अर्जदार लॉगिन हे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून घ्या
क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर लॉगिन पेज ओपन होईल
आता तुम्हाला स्वतःची यूजर आयडी पासवर्ड तयार करायचा आहे
त्यासाठी तुम्हाला Create Account ? या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे.
त्यानंतर तुमच्यासमोर Sign up फॉर्म ओपन होईल
त्यामध्ये तुम्हाला मागितलेली सर्व माहिती भरून घ्यायचे आहे
जर तुम्ही स्वतःचा अर्ज भरणार असाल त्यामध्ये तुम्हाला एथुराईज पर्सनच्या ठिकाणी General Women हे निवडायचा आहे.
आता तुम्हाला Accept Terms and condition यावर टीक करून कॅपच्या फील करून घ्यायचा आहे
पुन्हा एकदा तुम्ही भरलेली माहिती व्यवस्थितपणे तपासून Signup ह्या ऑप्शन वर क्लिक करून घ्यायचा आहे
अशा प्रकारे तुमची यूजर आयडी पासवर्ड तयार होईल याचा उपयोग करून या योजनेसाठी तुम्ही अर्ज सादर करू शकता.
वरील प्रमाणे तुम्हाला सर्वात पहिले या योजनेच्या पोर्टलची यूजरडी पासवर्ड तयार करून घ्यायचे आहे
यूजर पासवर्ड तयार झाल्यानंतर पुन्हा एकदा तुमच्यासमोर लॉगिन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्ही तयार
यूजर आयडी पासवर्ड इंटर करून लॉगिन करून घ्यायचा आहे

आता तुमच्यासमोर लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलचा डॅशबोर्ड दिसेल
त्यामध्ये तुम्हाला डॅशबोर्ड मधील Application of Mukhyamantri – Majhi Ladki Bahin Yojana या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे

आता तुम्हाला तुमचा आधार नंबर इंटर करावा लागेल आणि त्यानंतर कॅपच्या फील करून Validate Aadhar या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे

क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर योजनेचा अर्ज ओपन होईल
त्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला आधार प्रमाणे तुमचे नाव व संपूर्ण पत्ता व्यवस्थितपणे भरून घ्यायचा आहे
त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँकेची तपशील भरून घ्यायची आहे
आता तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यायचे आहेत
सर्व कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर जर अर्जामध्ये काही माहिती भरायची शिल्लक राहिली आहे आणि तुम्ही काही वेळानंतर अर्ज भरू इच्छिता तर तुम्ही Save as draft या ऑप्शनवर क्लिक करून तुमचा अर्ज सेव करून ठेवू शकता
अन्यथा तुम्ही submit ह्या ऑप्शन वर क्लिक करून घ्यावे
अर्ज सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर Registration Preview पेज ओपन होईल
तुम्ही भरलेली अर्जामध्ये माहिती व्यवस्थितपणे पुन्हा एकदा चेक करून घ्यायची आहे व सर्व माहिती बरोबर असल्यास कॅपच्या फील करून अर्ज सबमिट करून घ्या.
अशा प्रकारे तुम्ही सोप्या पद्धतीने घरबसल्या आपल्या मोबाईल फोन ने या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता .