मुंबई – कोलकाता संघाने गुरुवारी झालेल्या राजस्थानविरूद्धच्या सामन्यात 86 धावांच्या मोठ्या फरकाने दमदार विजय मिळवला. या विजयासह कोलकाताने गुणतालिकेतील आपले स्थान चौथे स्थान अधिक भक्कम केले आहे. हा सामना जिंकून कोलकाता ने 14 सामन्यात 7 विजयासह 14 गुण मिळवून मोठ्या रनरेटसह आपले स्थान भक्कम केले आहे.
रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स ( mumbai indians ) संघाला यंदाच्या आयपीएलची प्लेऑफची (IPL Playoff ) फेरी गाठायची असेल, तर MI पलटणला खूप मोठ्या फरकाने सनरायझर्स हैदाराबादच्या (sunrisers hyderabad ) संघाला पराभूत करावे लागणार आहे. IPL 2021 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांनी यापूर्वीच प्लेऑफमधील आपलं स्थान निश्चित केलं आहे
सध्या कोलकाता ( kolkata knight riders) संघ गुणतालिकेत 14 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. त्यांचा रनरेट +0.587 एवढा असून, मुंबईच्या संघाने 13 सामन्यात 6 विजय मिळवून 12 गुण मिळवले असून त्यांचा रनरेट -0.048 एवढा आहे. त्यामुळे चौथ्या स्थानी पोहोचण्यासाठी मुंबईच्या संघाला नुसताच विजय मिळवून चालणार नाही तर खूप मोठ्या फरकाने हा सामना जिंकावा लागेल.
आज होणाऱ्या सामन्यात हैदराबादच्या संघाने जर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, तर मुंबईचा पत्ता हा मैदानात उतरण्यापूर्वीच कट होणार आहे. कारण मुंबईच्या संघाला कितीही मोठ लक्ष दिसं तरी ते त्यांना पहिल्याच षटकात गाठावं लागणार आहे.