IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या T20 सामन्यांमध्ये टीम इंडियाची कामगिरी कशी राहिली? पाहा आकडे काय सांगतात

India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 20 सप्टेंबरपासून टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलियन संघ टी-20 मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. भारतातील ऑस्ट्रेलियाचा टी-20 रेकॉर्ड पाहिला तर तो प्रभावी ठरला आहे. गेल्या दोन टी-20 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन संघाने टीम इंडियाचा सलग पराभव केला आहे. तर भारताने पहिले 4 सामने जिंकले होते.
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत 7 टी-20 सामने भारतात खेळले गेले आहेत आणि यादरम्यान भारताने 4 सामने जिंकले आहेत. तर ऑस्ट्रेलियाला तीन सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ऑस्ट्रेलियन संघाने भारतात खेळलेला शेवटचा टी-20 सामना फेब्रुवारी 2019 मध्ये होता. या सामन्यात भारताला 2 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. या मालिकेतील पहिल्या सामन्यातही भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. यापूर्वी भारताने सलग चार सामने जिंकले होते.
भारताने टी-20 विश्वचषक 2022 आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी संघ घोषित केला आहे. यासाठी भारताने सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, अक्षर पटेल आणि रविचंद्रन यांच्यासह अनेक महत्त्वाच्या खेळाडूंचा संघात समावेश केला. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल यांचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. हे दोन्ही खेळाडू आशिया चषक 2022 साठी भारतीय संघाचा भाग नव्हते. भारत या दोन्ही गोलंदाजांना टी-20 विश्वचषकासाठी तयार करत आहे.