भगवान श्रीकृष्णाशी संबंधित अनेक रोचक गोष्टी आहेत. श्रीकृष्णाला हिंदू धर्मातील संपूर्ण अवतार मानले जाते. त्यांना 64 कलाचा स्वामी समजले जाते. कृष्णाची जन्माष्टमी देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. पण तुम्हाला माहिती आहे का श्रीकृष्णाचा मृत्यू कसा झाला होता. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत श्रीकृष्णाचा मृत्यू नेमका कसा झाला.
पौराणिक कथेप्रमाणे एके दिवशी श्रीकृष्ण पिंपळाच्या झाडाखाली ध्यान करत होते. यावेळी पारधी हरणाच्या शिकारासाठी आला होता. त्याला श्रीकृष्णाच्या पायाचा तळवा म्हणजे हरणाचे शीर असे वाटले. त्याने बाण चालवला. तो तळव्यात खोलवर गेला. पारध्याला त्याच्या कृत्याचा पश्चाताप झाला. त्याने क्षमायाचना केली. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, की तू विधीनियत काम केले आहे. हे तुझ्याच हातून होणार होते. अशा प्रकारे श्रीकृष्णाचा अंत झाला.
भगवान श्रीकृष्ण यांच्या देहावसना नंतर त्यांचे पार्थिव शरीरावर पांडवांनी अंतिम संस्कार केले. भगवान श्रीकृष्णाचे शरीराचे दहन झाले पण ह्रदयाचे दहन झाले नाही. तेव्हा भगवान श्रीकृष्णाच्या ह्रदयाचे दहन झाले नाही तेव्हा पांडवांनी ते ह्रदय जलप्रवाहित केले.
जलप्रवाहात ह्या ह्रुदयाचे लाकडी ओंडके झाले व ओरीसाच्या तटावर पोहोचले. तेथील राजा ईऺद्रद्युम्न याला भगवान श्रीकृष्ण याऺनी दृष्टाऺत दिला की जो लाकडी ओंडका समुद्र तटावर आहे त्या पासून भगवानाची मुर्ती बनव. राजा ईऺद्रद्युम्न याने मुर्ती बनवून स्थापन केली. ह्याच मुर्ती ला आपण भगवान जगन्नाथ म्हणून पुजतो.