देशात कोविड 19 नंतर आता झिका व्हायरसने धोक्याची घंटा वाजवली आहे. कर्नाटकातील रायचूर येथील पाच वर्षांच्या मुलीमध्ये झिका विषाणूची पुष्टी झाली आहे. त्यामुळे लोकांच्या चिंतेत भर पडली आहे. मात्र सरकार याला सामोरे जाण्यासाठी सर्वतोपरी पावले उचलणार असल्याचे म्हटले आहे. गर्भवती महिला आणि नवजात बालकांना या विषाणूपासून सर्वात जास्त संरक्षणाची गरज असते. झिका विषाणू एडिस डासाच्या चाव्याव्दारे शरीरात प्रवेश करतो आणि जन्मलेल्या बाळामध्ये मायक्रोसेफली होतो.
झिका व्हायरस काय आहे
WHO (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) च्या मते, झिका व्हायरस एडिस डासाच्या चाव्याव्दारे पसरतो. डेंग्यू, चिकुनगुनिया आणि पिवळा ताप एडिस डासांच्या चावण्याने पसरतो. हे 3 विषाणू जवळपास सारखेच आहेत. या तिघांचा प्रसार पश्चिम, मध्य आफ्रिका आणि आग्नेय आशियामधून सुरू झाला. झिका विषाणू गर्भवती महिलेपासून गर्भात असलेल्या बाळामध्ये पसरतो.
झिका व्हायरसची लक्षणे
झिका व्हायरसची लक्षणे खूप सामान्य आहेत. यामध्ये शरीरावर लाल पुरळ उठणे, खूप ताप येणे, स्नायू आणि सांधे दुखणे आणि डोकेदुखी इत्यादींचा समावेश आहे. या विषाणूची लागण झालेल्या बहुतांश लोकांमध्ये लक्षणे आढळत नाहीत.
झिका व्हायरसपासून संरक्षण
यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार, सध्या झिकावर कोणतीही लस किंवा उपचार नाही. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की झिका ची लागण झालेल्या लोकांना सतत पाणी मिळत राहणे अत्यंत आवश्यक आहे. भरपूर पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते आणि शरीराला ऊर्जा मिळते.
झिका विषाणूची लागण झाल्यावर लक्षणे आणि उपचारांबाबत जागरुक असणे अत्यंत आवश्यक आहे. झिका विषाणू हा बहुतेक लोकांमध्ये होणारा सौम्य संसर्ग आहे. सामान्य लक्षणांमध्ये ताप, पुरळ, स्नायू आणि सांधेदुखी यांचा समावेश होतो. ही लक्षणे कमी करण्यासाठी डॉक्टर औषधे लिहून देतात. हे महत्वाचे आहे की घेतलेले कोणतेही औषध डॉक्टरांनी लिहून दिलेले असावे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तुम्ही कोणतेही औषध घेऊ नये. तसेच, जास्तीत जास्त विश्रांती घ्या, पाणी आणि हलका आहार देखील बरे होण्यास मदत करतो. आणि डॉक्टरही अनेक प्रकारची औषधे टाळण्याचा सल्ला देतात.