
मुंबई: शिवसेनेच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच दोन दसरा मेळावे घेण्यात आले. एक म्हणजे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा तर दुसरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा काल पार पडला. उद्धव ठाकरेंची सभा ही दादरच्या शिवाजी पार्क मैदानात घेण्यात आली, तर एकनाथ शिंदेंची सभा ही बीकेसी मैदानात झाली. या दोन्ही सभांना मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. मात्र, या दोन्ही सभांपैकी कोणाच्या सभेला किती गर्दी होती याबाबत आता तर्क-वितर्क लावले जात असताना मुंबई पोलिसांनी आकडेवारी जाहीर केली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला 65 ते 70 हजार तर मुख्यमंत्री शिंदेंच्या मेळाव्याला 90 हजारे ते 1 लाख लोकांची गर्दी होती, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांनी दिलेली ही आकडेवारी अंदाजे व्यक्त केली गेलेली आहे.
बीकेसीतील शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला अधिक गर्दी होती, असे ठाकरे गटानेही मान्य केले आहे, मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांनी भाषण वाचण्यास सुरुवात करताच 50 टक्के लोक सभेतून निघून गेले, असा दावाही करण्यात आला आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा, तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर देखील फॉलो करा. Insidemarathi.com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या
INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा