
सध्या फ्रेंच ओपन सुरू आहे जिथे जबरदस्त सामने सतत खेळले जात आहेत. मात्र यादरम्यान वादही होत असून, असाच एक वाद आता पाहायला मिळाला आहे. जेव्हा महिला टेनिस स्टार सामना खेळण्यासाठी पोहोचली तेव्हा अंपायरने तिला तिच्या ड्रेसबद्दल व्यत्यय आणला आणि ड्रेस बदलण्यास सांगितले.
फ्रेंच ओपनच्या तिसऱ्या फेरीत इटालियन टेनिसपटू कॅमिला जिओर्गी तिची मॅच खेळण्यासाठी पोहोचली तेव्हा अंपायरने तिला आपल्याकडे बोलावले. अंपायरने कॅमिला जॉर्जीच्या ड्रेसवर आक्षेप घेत तुम्हाला हा ड्रेस बदलावा लागेल असे सांगितले.
मात्र, कॅमिला जिओर्गी हिने पंचांना सांगितले की, तिने दुसरा कोणताही ड्रेस आणला नाही, त्यामुळे तिच्याकडे कोणताही पर्याय नव्हता. कॅमिला ज्योर्गीच्या ड्रेसवर असलेल्या जाहिरातीवरून हा वाद निर्माण झाला होता. अंपायरच्या म्हणण्यानुसार जाहिरातीचा आकार मोठा होता, त्यामुळे ते नियमांच्या विरोधात आहे.
जेव्हा कॅमिला ज्योर्गी म्हणाली की आपल्याकडे अजून दूसरा कोणताही ड्रेस नाहीय, तेव्हा पंचाने तिला त्याच ड्रेसमध्ये खेळण्याची परवानगी दिली परंतु नंतर कारवाईची मागणी केली. विशेष म्हणजे जागतिक क्रमवारीत 30व्या क्रमांकाची खेळाडू कॅमिला जिओर्जीने हा सामना 4-6, 6-1, 6-0 असा जिंकला.इंस्टाग्रामवर कॅमिला जिओर्जीचे 6 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत, ती सतत तिचे हॉट फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते.