
जबलपूर शहरातील न्यू लाईफ स्पेशालिटी हॉस्पिटलला आग लागली आहे. या आगीत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. आगीमुळे रुग्णालयात बराच वेळ घबराटीचे वातावरण होते.
जबलपूर सीएसपी अखिलेश गौर यांनी आग भयंकर असल्याचे सांगितले. बचावासाठी गेलेले आमचे चार पथकही हॉस्पिटलमध्ये अडकले होते. आगीचे कारण शॉर्ट सर्किट असू शकते. असं ते म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. या हॉस्पिटलमध्ये सुमारे 100 लोकांचा स्टाफ आहे. मात्र, एकूण मृतांचा आकडा किती असावा याबाबत साशंकता आहे. आता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
#WATCH | Madhya Pradesh: Fire breaks out at Jabalpur Hospital. Further details awaited pic.twitter.com/RdjjqARKIY
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) August 1, 2022
काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगितले जात आहे की, दमोह नाका येथून काही लोक निघत असताना हॉस्पिटलमध्ये आग लागल्याचे दिसले तेव्हा ही घटना उघडकीस आली. त्यावेळी लोकांनी आरडाओरडाही ऐकला. यानंतर या लोकांनी लगेच पोलीस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. मात्र आग इतकी भीषण होती की अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत आग सर्वत्र पसरली होती.आग इतकी भीषण होती की अग्निशमन दलाच्या जवानांना त्यावर नियंत्रण मिळवता आले नाही, असे सांगण्यात येत आहे. रुग्णालयातील वीज कनेक्शन तोडण्यात आले. त्यानंतर या भीषण आगीवर नियंत्रण मिळवता आले.