ओडिशात भीषण रस्ता अपघात, 10 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

WhatsApp Group

ओडिशामध्ये एक भीषण रस्ता अपघात समोर आला आहे. गंजम जिल्ह्यात काल रात्री दोन बसच्या धडकेत 10 जण ठार तर सहा जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या अपघातातील लोकांच्या मृत्यूबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 3 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

बेरहामपूरमध्ये स्थानिक मिनी बस आणि ओएसआरटीसी बसची समोरासमोर धडक झाली, ज्यामुळे हा अपघात झाला. यामध्ये 10 जणांना आपला जीव गमवावा लागला. ही घटना ओडिशातील गंजाम जिल्ह्यातील दिघंडी परिसरातून समोर आली आहे.

जखमींना सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न – डीएम

या प्रकरणी माहिती देताना गंजामचे डीएम दिव्या ज्योती परिदा म्हणाले, “दोन बसची टक्कर झाली, ज्यात 12 जणांचा मृत्यू झाला. जखमींना तातडीने एमकेसीजी मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आम्ही प्रयत्न करत आहोत. जखमींना शक्य ती सर्व मदत पुरवण्यासाठी.

ओएसआरटीसीची बस रायगडाहून भुवनेश्वरला जात होती. दुसरीकडे, पातापूर पोलीस हद्दीतील खंडाडेउली गावातील एक कुटुंब वधूला तिच्या सासरच्या घरी सोडण्यासाठी गेले होते. लग्नसोहळ्यानंतर सर्वजण मिनी बसने घरी परतत होते. दरम्यान, विरुद्ध दिशेने येणाऱ्या ओएसआरटीसी बसची समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर मिनी बस पलटी झाली.

घटनेनंतर घटनास्थळी गर्दी झाली. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना बेरहामपूर येथील एमकेसीजी रुग्णालयात रेफर करण्यात आले. OSRTC बसमधील प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र, चालकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. पहाटे एक वाजता हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मृतांमध्ये चार महिला आणि दोन अल्पवयीन मुलांचा समावेश

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. पोलिसांनीही या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील दोन अल्पवयीन, चार महिला आणि सहा पुरुषांचा समावेश आहे. मात्र, या घटनेमागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाशी संबंधित सविस्तर अहवालाची प्रतीक्षा आहे.

जखमींना सरकार 30-30 हजार रुपये देणार 

बेरहामपूरचे एसपी म्हणाले की, दिगपहांडी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अनेक प्रवाशांची सुटका केली. अपघातामागचे खरे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, असेही ते म्हणाले. आमची चौकशी सुरू आहे. ओडिशा सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 3 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 30 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.