
Bank Holidays In July 2022: जून महिना संपून जुलै सुरू होण्यासाठी केवळ काही दिवस बाकी आहेत. त्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) जुलै महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला जर जूलैमध्ये बँकेत काही काम असेल तर बँकांच्या सुट्ट्याविषयी (Holidays in July 2022) माहिती असणे गरजेचे आहे.
आरबीआयच्या याा यादीनुसार जुलैमध्ये एकूण 16 दिवस बँका बंद राहणार आहेत. या 16 बँक सुट्ट्यांमध्ये 5 रविवारच्या साप्ताहिक सुटट्यांचाही (Bank Holidays Dates in July) समावेश आहे. तर इतर काही दिवशी प्रादेशिक सणांमुळे बँका बंद राहतील.
सुट्ट्यांची यादी
1 जुलै 2022 : कांग रथयात्रा – भुवनेश्वर आणि इंफाळमध्ये बँकांना सुट्टी असेल.
3 जुलै 2022 : रविवार असल्याने साप्ताहिक सुट्टी असेल.
5 जुलै 2022 : गुरु हरगोविंदांचा प्रकाश दिन (जम्मू आणि काश्मीर)
6 जुलै 2022 : एमएचआयपी दिवस (मिझोरम)
7 जुलै 2022 : खर्ची पूजा (आगरतळामध्ये बँक बंद)
9 जुलै 2022 : ईद-उल-अधा (बकरीद) आणि महिन्याचा दुसरा शनिवार.
10 जुलै 2022 : रविवार असल्याने साप्ताहिक सुट्टी असेल.
11 जुलै 2022 : इज-उल-अजा ( जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँक बंद)
13 जुलै 2022 : भानु जयंती (गंगटोक बँक बंद)
14 जुलै 2022 : बेन दियानखलम (शिलाँग बँक बंद)
16 जुलै 2022 : हरेला (देहरादून येथे बँक बंद)
17 जुलै 2022 : रविवार असल्याने साप्ताहिक सुट्टी असेल.
23 जुलै 2022 : महिन्याचा चौथा शनिवार असल्याने सुट्टी असेल.
24 जुलै 2022 : रविवार असल्याने साप्ताहिक सुट्टी असेल.
26 जुलै 2022 : केर पूजा (आगरतळामध्ये बँक बंद)
31 जुलै 2022 : रविवार असल्याने साप्ताहिक सुट्टी असेल.