Hockey World Cup 2023: कलिंगा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या हॉकी विश्वचषक (Hockey World Cup 2023) च्या क्रॉस-ओव्हर सामन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चांगलीचं टक्कर पहायला मिळाली. संपूर्ण सामन्यादरम्यान टीम इंडिया या सामन्यात मजबूत स्थितीत दिसली पण शेवटी किवींनीच विजय मिळवला. शूटआऊटमध्ये न्यूझीलंड संघाने हा सामना 4-5 असा जिंकला. या पराभवामुळे भारतीय संघ हॉकी विश्वचषक 2023 मधून बाहेर पडला आहे, तर न्यूझीलंडने उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे. सामना 3-3 असा बरोबरीत संपला. त्यानंतर पेनल्टी शूटआऊटमधून निकाल लागला. भारतीय हॉकी संघाने सुरुवातीपासूनच सामन्यावर पकड ठेवली होती, पण सामना अंतिम टप्प्यात पोहोचताच न्यूझीलंडने दमदार पुनरागमन केले.
याआधी भारताने शेवटच्या सामन्यात स्पेनचा पराभव केला होता. इंग्लंडचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर असून थेट उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. क्रॉस ओव्हरच्या सामन्यातूनच भारताला उपांत्यपूर्व फेरी गाठण्याचा मार्ग होता.
India bow out of the #HWC2023 after losing to New Zealand in penalty shootouts 💔
🇮🇳IND 3-3 NZL🇳🇿
(SO: 4-5)#HockeyIndia #IndiaKaGame #HWC2023 #HockeyWorldCup2023 @CMO_Odisha @sports_odisha @IndiaSports @Media_SAI @BlackSticks pic.twitter.com/EPcLlJhtrg— Hockey India (@TheHockeyIndia) January 22, 2023