Rohit Sharma Birthday: रोहित शर्माचा आज 35वा वाढदिवस, जाणून घ्या रोहितच्या नावावर असलेले हे खास विक्रम

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आज (30 एप्रिल) रोजी त्याचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. तो सध्या आपल्या कुटुंबासह मुंबई इंडियन्स संघाच्या बायो बबलमध्ये आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त, रोहित शर्मा हंगामातील 9 वा सामना खेळण्यासाठी जाईल आणि या दिवशी संघाला पहिला विजय मिळवून द्यावा अशी त्याची इच्छा आहे. रोहित शर्माचे चाहते सोशल मीडियावर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.
जाणून घ्या रोहितच्या नावावर असलेले हे खास विक्रम
- आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतकांचा वर्ल्ड रेकॉर्ड हा रोहितच्या नावावर आहे. रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1 आणि श्रीलंकेविरुद्ध 2 अशी एकदिवसीय क्रिकेटमध्ये 3 द्विशतके ठोकली आहेत. एवढेच नव्हे तर तर वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावांचा विक्रम देखील रोहितने नोंदवला आहे. रोहितने श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक 264 धावांची खेळी केली होती.
- टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या नावावर सर्वाधिक 4 टी-20 शतके आहेत. यातील एक श्रीलंकेविरुद्धचं शतक तर रोहितने इंदोर 35 चेंडूत पूर्ण केले होते.
- 2019 च्या विश्वचषकात रोहित शर्माने 5 विश्वविक्रमी शतकांसह 9 सामन्यात 648 धावा केल्या. शिवाय एका विश्वचषक स्पर्धेत पाच शतकं करणारा रोहित पहिला खेळाडू होता.
तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचा कर्णधार
रोहित शर्मा सध्या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा कर्णधार आहे. त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 400 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याच्या एकूण 15733 धावा आहेत. रोहित शर्माने सर्व फॉरमॅटमध्ये 41 शतके आणि 84 अर्धशतके केली आहेत.
30th April bole toh आपल्या रोहित चा बर्थडे! ????
पलटन, मग होऊ द्या की replies मध्ये सेलिब्रेशन! ????#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians @ImRo45 pic.twitter.com/iPbA9dFJDH
— Mumbai Indians (@mipaltan) April 29, 2022
मुंबई इंडियन्ससाठी रोहित शर्माची ऐतिहासिक कामगिरी
आयपीएल 2022 मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्मासाठी चांगले गेले नाही, परंतु तरीही तो आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आणि सर्वाधिक विजेतेपद मिळवणारा मुंबई इंडियन्स संघ आहे. रोहित शर्माने त्याच्या नेतृत्वाखाली 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये मुंबई इंडियन्सला चॅम्पियन बनवले आहे.
रोहित शर्माचे चाहते सोशल मीडियावर शुभेच्छा देत आहेत
#HappyBirthdayRohit #RohitSharmaBirthdayCDP #RohitSharma????
HAPPY BIRTHDAY ROHIT pic.twitter.com/Rqi8BWDGP6— Mahesh Dhulipudi45 (@IamMahe45) April 29, 2022
Everybody is a gangster
Till you see the monster ????????Wish You Very Happy Birthday Hitman Rohit Sharma. @ImRo45 #RohitSharma #Hitman #HappyBirthdayRohit @mipaltan pic.twitter.com/qwv6zBVIT9
— HITMAN ROCKY ???? (@HITMANROCKY45_) April 29, 2022
Happy birthday @ImRo45 ????#HappyBirthdayRohit pic.twitter.com/3Vf5qPLslE
— Steve ♡ (@Steve_xxx__) April 29, 2022