
Rohit Sharma Record: भारतीय संघ 2022 च्या T20 विश्वचषकात नेदरलँड्स विरुद्ध दुसरा सामना खेळत आहे. या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 20 षटकांत 2 गडी गमावून 179 धावा केल्या. संघाचा कर्णधार रोहित शर्माने 39 चेंडूत 53 धावा केल्या. ही खेळी खेळून त्याने महेंद्रसिंग धोनीचा टी20 विश्वचषकात कर्णधार म्हणून विक्रम मोडला आणि असे करणारा तो दुसरा भारतीय कर्णधार ठरला आहे.
रोहित शर्मा पहिल्यांदाच T20 विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. या सामन्यात रोहितने कर्णधार म्हणून 53 धावांची खेळी खेळली. त्याचवेळी महेंद्रसिंग धोनीने T20 वर्ल्ड कपमध्ये कर्णधार म्हणून 45 धावांची सर्वोच्च खेळी खेळली होती. रोहित शर्माने महेंद्र धोनीचा हा विक्रम मोडला असून अशी कामगिरी करणारा तो दुसरा कर्णधार ठरला आहे. या बाबतीत संघाचा माजी कर्णधार विराट कोहली अजूनही 57 धावांच्या खेळीसह पहिल्या क्रमांकावर आहे. 2021 च्या T20 विश्वचषकात कोहलीने पाकिस्तानविरुद्ध ही खेळी खेळली होती. मात्र, टीम इंडियाने तो सामना गमावला होता.
उल्लेखनीय म्हणजे नेदरलँड्सविरुद्ध खेळताना रोहित शर्माने T20 विश्वचषकात सर्वाधिक 35 सामने खेळण्याचा विक्रम केला आहे. या यादीत त्याने श्रीलंकेचा माजी फलंदाज तिलकरत्ने दिलशानची बरोबरी केली. यासोबतच रोहित शर्मा T20 वर्ल्ड कपमध्ये षटकार मारण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. रोहित शर्माने T20 वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत एकूण 34 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर क्रिस गेल 63 षटकारांसह पहिल्या क्रमांकावर आहे.