‘हिटलर दीदी’ फेम अभिनेत्री डॉली सोहीचे निधन, बहिणीच्या मृत्यूनंतर 48 तासांनी घेतला अखेरचा श्वास

WhatsApp Group

टीव्ही जगतातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अभिनेत्री डॉली सोहीचे आज सकाळी वयाच्या 48 व्या वर्षी निधन झाले. तिची बहीण अमनदीप सोही हिचा काल रात्री मृत्यू झाला. अमनदीपच्या मृत्यूनंतर अवघ्या काही तासांतच हृदयद्रावक बातमी आली की डॉली सोही आता या जगात नाही. डॉली गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाशी झुंज देत होती तर अमनदीपचा काविळीच्या आजाराने मृत्यू झाला. टाइम्स ऑफ इंडियाच्या ETimes टीव्हीने त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

डॉलीच्या कुटुंबीयांनी मृत्यूला दुजोरा दिला
डॉलीचा भाऊ मनु याने सांगितलं की, डॉलीचं सकाळी निधन झालं. यामुळे आमच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. तिच्यावर आज दुपारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dolly Sohi (@dolly_sohi)

डॉली साहूच्या भावाने तिच्या आणि बहिणीच्या निधनाची माहिती दिलीय. अमनदीप सोहीसुद्धा टीव्ही अभिनेत्री होती. दोन दिवसात दोन्ही बहिणींच्या निधनाने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अमनदीप सोही बदतमीज दिलमधून प्रसिद्धीच्या झोतात आली होती. अमनदीपचे निधन कावीळीने झाल्याचं मनु सोहीने सांगितलं.

गेल्या काही महिन्यांपासून डॉली सोहीची प्रकृती खालावली होती. तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. मुंबईतील एका रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये तिला सर्वायकल कॅन्सर झाल्याचं समोर आलं होतं.