Paris Olympics 2024 : मनू भाकरनं रचला इतिहास; ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय नेमबाज ठरली!

WhatsApp Group

Paris Olympic 2024: भारतीय नेमबाज मनू भाकरने इतिहास रचला आहे. तिने कांस्यपदक जिंकले आहे. मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत चमकदार कामगिरी करत कांस्यपदक जिंकले. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू ही पहिली महिला नेमबाज ठरली आहे.

मनू भाकर यांचा जन्म हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील गोरिया गावात झाला. त्यांचे वडील राम किशन भाकर मर्चंट नेव्हीमध्ये मुख्य अभियंता पदावर आहेत. वयाच्या 14 व्या वर्षी भाकरनं मणिपुरी मार्शल आर्ट्स तसेच बॉक्सिंग, टेनिस आणि स्केटिंग यासारख्या इतर खेळांमध्ये प्रावीण्य मिळवले आणि राष्ट्रीय खेळांमध्ये या स्पर्धांमध्ये पदकं जिंकली आहेत.

मनू भाकर ने पात्रता फेरीत 580-27x एवढा स्कोअर केला. रिदिमा सांगवान हिनं  573-14x एवढा स्कोअर केला. उद्या दुपारी भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता 10 मीटर एअर पिस्टलची अंतिम फेरी होणार आहे. भारताच्या चाहत्यांना मनू भाकरकडून सुवर्णपदकाची आशा असेल.

2018 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मनूनं महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकले. तेही वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी. त्याच वेळी, तिने 2022 आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात ईशा सिंग आणि रिदम संगवान यांच्यासह भारतासाठी सुवर्णपदक जिंकले.