शुबमन गिलने रचला इतिहास! बाबर आझम हाशिम आमलाला मागे टाकत केला ‘हा’ खास पराक्रम

WhatsApp Group

भारतीय फलंदाज शुभमन गिलने इतिहास रचला आहे. वनडे फॉरमॅटमध्ये सर्वात जलद दोन हजार धावा करणारा गिल जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू हाशिम अमलाच्या नावावर ही खास कामगिरी नोंदवली गेली होती. या माजी आफ्रिकन क्रिकेटपटूने वनडे फॉरमॅटमध्ये 40 डावांमध्ये दोन हजार धावा केल्या होत्या. गिलने 38 डावात ही कामगिरी केली आहे.

वनडे फॉरमॅटमध्ये सर्वात जलद दोन हजार धावा करण्यात भारतीय सलामीवीराने फक्त हाशिम अमलालाच मागे सोडलेले नाही. त्याने रॅसी व्हॅन डर डुसेन, इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसन आणि सध्याचा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांनाही मागे टाकले आहे. डसेन, पीटरसन आणि बाबर यांनी अनुक्रमे 45-45 डावांमध्ये वनडे फॉरमॅटमध्ये दोन हजारांचा आकडा गाठला होता.

वनडे फॉरमॅटमध्ये सर्वात जलद दोन हजार धावा करणारे खेळाडू

  • शुभमन गिल – 38 डाव – भारत
  • हाशिम आमला – 40 डाव – दक्षिण आफ्रिका
  • रॅसी व्हॅन डर डुसेन – 45 डाव – दक्षिण आफ्रिका
  • केविन पीटरसन – 45 डाव – इंग्लंड
  • बाबर आझम – 45 डाव – पाकिस्तान

न्यूझीलंडविरुद्ध डावाची सुरुवात करताना शुभमन गिलने 31 चेंडूत 83.87 च्या स्ट्राईक रेटने 26 धावा केल्या. या काळात त्याच्या बॅटमधून पाच चौकार आले. गिलला लॉकी फर्ग्युसनने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.