विद्यार्थ्यांची माथी भडकावणाऱ्या ‘हिंदुस्थानी भाऊ’ला मुंबई पोलिसांनी केली अटक

WhatsApp Group

मुंबई पोलिसांनी ‘हिंदुस्थानी भाऊ’वर कारवाई करत त्याला अटक केली आहे Hindustani Bhau was arrested. विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी चिथावणी दिल्याप्रकरणी पोलिसांनी हिंदुस्थानी भाऊला अटक केली असून अटकेपूर्वी हिंदुस्थानी भाऊंनी जामिनासाठी वकिलांचा सल्ला घेतला आहे.

या संपूर्ण घटनेच्या चौकशीचे आदेश गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले होते. सोमवारी मुंबईतील धारावीमध्ये विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. कोविड-19 च्या संकटाच्या काळात दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाइन कराव्यात, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. हिंदुस्थानी भाऊचे खरे नाव विकास पाठक आहे Vikas Phatak (Hindustani Bhau) .

महाराष्ट्रातील अनेक भागात सोमवारी दहावी आणि बारावीचे विद्यार्थी ऑनलाइन परीक्षा घेण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले. सर्व विद्यार्थ्यांनी मुंबईतील धारावी येथील शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराजवळ आंदोलन केलं होतं. शेकडोच्या संख्येने जमलेल्या विद्यार्थ्यांच्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला होता.