
शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर सध्या काही ना काही कारणामुळे सतत चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी संतोष बांगर यांचा ताफा शिवसैनिकांनी अडवल्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्यानंतर संतोष बांगर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. पण आता संतोष बांगर आपल्या एका समर्थकामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, उद्धव ठाकरे यांनी स्वत: या प्रकरणाची दखल घेतली असून महिला पदाधिकाऱ्याची विचारपूस केली आहे.
संतोष बांगर यांच्या कथित समर्थकाने युवासेनेच्या महिला पदाधिकाऱ्याला फोन करुन शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होतं आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये हा समर्थक अयोध्या पोळ यांच्याशी शिवीगाळ करत बोलत असल्याचं ऐकू येत आहे.
दरम्यान ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्या पोळ यांच्याशी संवाद साधत विचारपूस केली. यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांनी पोलिसात तक्रार देण्याचा सल्ला दिला.
INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा