बंगळुरू संघाच्या नावावर आहे आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठा विक्रम

WhatsApp Group

२३ एप्रिल २०१३ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू Royal Challengers Bangalore आणि पुणे वॉरियर्स इंडिया Pune Warriors India यांच्यात झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने धावांचा पाऊस पाडला होता. या सामन्यात बेंगलोरने २६३ धावांचा डोंगर रचला होता Highest Score in IPL History. हा विक्रम अद्याप कोणत्याही संघाला मोडता आलेला नाही.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना वेस्ट इंडिजचा वादळी फलंदाज ख्रिस गेलने Chris Gayle पुणे वॉरियर्स इंडियाविरुद्ध नाबाद १७५ धावांची शतकी खेळी केली होती. या सामन्यात गेलने अवघ्या ६६ चेंडूमध्ये १३ चौकार आणि १७ षटकारांच्या मदतीने १७५ धावांची खेळी केली होती. गेलच्या या वादळी खेळीच्या जोरावर आरसीबीने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या उभारली होती. तसेच एका आयपीएल सामन्यात १७ षटकार मारण्याचा विक्रम आजही गेलच्याच नावावर आहे.


या सामन्यात आयपीएलच्या इतिहासातील एका संघाकडून सर्वाधिक म्हणजे २६३ धावांचा विक्रम रचला गेला होता. हा विक्रम अद्याप कोणालाही मोडता आलेला नाही.