
विद्यार्थ्यांनी निकालाआधी गोंधळ होऊ नये म्हणून काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजचेचे आहे.
- निकाल चेक करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि आईचं नाव महत्वाचं असणार आहे.
- जर तुमच्या रोल नंबरवरून तुमचा रिझल्ट दिसत नसेल तर तुमच्या आईच्या नावाने तुम्हाला रिझल्ट बघता येणार आहे.
- तसंच विद्यार्थ्यांना निकाल चेक करण्याआधी संपूर्ण क्रेडेन्शियल्स बरोबर आहेत ना याची खात्री करणं आवश्यक असणार आहे.
- निकाल बघताना तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन बरोबर आहे ना याचीही खात्री करून घ्या.
- शक्य असल्यास निकाल हा लॅपटॉप किंवा कम्प्युटरवरच बघा.
- मोबाईल आणि SMS द्वारेही निकाल बघता येणार आहे.
महाराष्ट्र बारावीचा निकाल 2022 एसएमएसद्वारे पाहण्याची पद्धत
- महाराष्ट्र 12वीचा निकाल 2022 एसएमएसद्वारे पाहण्यासाठी, विद्यार्थ्यांनी दिलेल्या फॉरमॅटमध्ये एसएमएस टाइप करणे आवश्यक आहे.
- या फॉरमॅटमध्ये एसएमएस टाइप करा : MHHSC<space>सीट क्रमांक लिहून 57766 वर पाठवा. तुम्हाला तुमचा रिझल्ट अवघ्या काही सेंकदात मिळणार आहे.