‘सुपर 12’ फेरीचे चित्र स्पष्ट, पाहा कोणते 12 संघ विजेतेपदासाठी खेळणार

WhatsApp Group

शारजाह – आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेची पहिली म्हणजेच पात्रता फेरी संपली आहे. पात्रता फेरीमध्ये ‘अ’ गटातून श्रीलंका आणि नामिबिया तर ‘ब’ गटातून स्कॉटलंड आणि बांगलादेश या संघानी ‘सुपर 12’ फेरीत धडक मारली आहे.

ओमान, पापुआ न्यू गिनी, आयर्लंड आणि नेदरलँड्स हे चार संघ टी२० विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. पात्रता फेरीत सर्वात मोठा धक्का हा तुलनेत बलाढ्य समजल्या जाणाऱ्या आयर्लंडला संघाला बसला आहे. आता एकूण 12 संघ विश्वविजेतेपदासाठी एकमेकांचा सामना करतील.

टी२० विश्वचषक 2021 ‘सुपर 12’ फेरीसाठी 2 गटात संघ विभागण्यात आले आहेत.

गट 1 – वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि बांगलादेश

गट 2 – भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबिया

‘सुपर 12’ फेरीची सुरुवात २३ ऑक्टोबर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याने होईल. तर भारताचा ‘सुपर 12’ फेरीतील पहिला सामना 24 ऑक्टोबरला पाकिस्तानसोबत होणार आहे.

आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना 14 नोव्हेंबला दुबई येथे संध्याकाळी 7.30 वाजता खेळवण्यात येईल.