‘बाहेरच्या देशात काढलेले फोटो clear येतात आणि आपल्या देशात…’ हेमांगी कवीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

WhatsApp Group

अभिनेत्री आणि नृत्यांगना हेमांगी कवी धुमाळ हे नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. हेमांगी अनेकदा सोशल मीडियावर तिचे मत बिनधास्तपणे मांडताना दिसते. हेमांगी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. ती नेहमी तिचे अनेक फोटो आणि धमाल व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसते. हेमांगी काही दिवसांपूर्वी परदेशात फिरायला गेली होती. त्याचे काही फोटो हेमांगीनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत भारतात आणि परदेशात काढलेल्या फोटोंमध्ये काय फरक आहे हे हेमांगीनं सांगितलं आहे.

हेमांगी कवी ही फेसबुकवर नेहमीच सक्रीय असते. ती नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. नुकतंच हेमांगी ही तिच्या कामातून वेळ काढत न्यूयॉर्कला फिरण्यासाठी गेली होती. यावेळी तिने तिचे अनेक फोटो फेसबुकवर पोस्ट केले होते. त्यासोबत तिने काही व्हिडीओ देखील शेअर केले होते. या व्हिडीओमुळे काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले होते. दरम्यान आता तिने या सर्व ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे.

तिने फेसबुकवर न्यूयॉर्कमधील काही फोटो पोस्ट केले आहेत. ती म्हणाली की, बाहेरच्या देशांमध्ये काढलेले फोटो जास्त क्लिअर आणि क्लीन येतात. आपल्या आणि आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये Pollution चा थर नसावा म्हणून असेल का? त.टी : सहज एक observation आहे, कुठला महान शोध लावल्याच दावा अध्यक्ष करत नाहीयेत याची मंडळाने नोंद घ्यावी. आपल्या देशातल्या pollution ला मी ही कारणीभूत आहे याची मला जाणिव आहे. तेव्हा नमस्कार.”हेमांगीची ही पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी हेमांगीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.