
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील मौजे चिखली, शिंगणापूर, बळीवडे या गावातील १९८९ मधील महापूर आणि २०१९ मधील अतिवृष्टीय पूरामुळे बाधित झालेल्या कुटुंबाला घर बांधण्याकरिता ९५ हजार १०० रुपये आणि अंशत: पडझड झालेल्या घरांसाठी ६ हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाने एक कोटी ५६ लक्ष ४२ हजार ३०० रूपये इतका निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील मौजे चिखली, शिंगणापूर, बळीवडे या गावातील १९८९ साली महापुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. परंतू पुनवर्सन गावठाणात न जाता मूळ गावठाणात वास्तव्य करीत आहेत.
जुलै-ऑगस्ट, २०१९ मधील अतिवृष्टी पूरामुळे बाधित झालेल्या नागरिकांना त्यांच्या मूळ गावठाणातील घरपडझडीमुळे पूर पुनर्वसन गावठाणात वाटप केलेल्या भूखंडावर घराचे बांधकाम करण्याच्या अटीवर मानवतेच्यादृष्टीने ९५ हजार १०० रूपये प्रति कुटुंब इतके अनुदान आणि अंशत: पडझड झालेल्या घरांसाठी ६ हजार रूपये प्रति कुटुंब इतके अनुदान दिले जाणार आहे. दि. ०८ जुलै २०२० व १२ मे २०२१ रोजीच्या मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयान्वये अटींच्या अधीन राहून १ कोटी ५६ लक्ष ४२ हजार ३०० रूपये इतका निधी विभागीय आयुक्त, पुणे यांच्यामार्फत जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांना वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.